#CentralRailwayMegaBlock #CentralRailway #MegablockUpdate #MaharashtraTimes
2 जानेवारीला म्हणजे रविवारी मध्य रेल्वेचा २४ तासांचा जम्बो मेगाब्लॉक आहे.कळवा-ठाकुर्ली मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद असणार आहे. मध्य रेल्वेकडून ठाणे ते दिवा दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गी मार्गावर नवीन रुळ टाकण्यात आला आहे.या रुळावरून सध्याच्या धीम्या मार्गावरील रुळांना जोडण्यात येणार आहे.येत्या रविवारी २ जानेवारी ते ३ जानेवारी २०२२ दरम्यान पुन्हा २४ तासांचा तिसरा जम्बो मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. जम्बो मेगाब्लॉक दरम्यान सर्व उपनगरीय सेवांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत.तर अनेक लोकल आणि एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. या जम्बो मेगाब्लॉक दरम्यान कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली या स्थानकांवर लोकल थांबणार नाहीत.जम्बो मेगाब्लॉक दरम्यान कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली येथील प्रवाश्यांसाठी KDMCकडून बसेसची व्यवस्था करण्यात येणार आहेत.यासाठी मध्य रेल्वेकडून महापालिका परिवहन उपक्रमाशी समन्वय साधल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.