¡Sorpréndeme!

सदऱ्यावर मुख्यमंत्र्यांचा फोटो आणि 'ठाकरे सरकार हाय हाय'ची टोपी; आमदाराने केला सरकारचा निषेध

2021-12-27 248 Dailymotion

राज्याच्या पाच दिवसीय हिवाळी अधिवेशनाला २२ डिसेंबर २०२१ पासून सुरुवात झाली. हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. विरोधी पक्षाकडून सत्ताधारी पक्षाविरोधात विधानभवनाच्या परिसरात घोषणाबाजी करण्यात आली. चाळीसगावचे भाजपा आमदार मंगेश चव्हाण राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी वेगळ्याच वेशात दिसले. मंगेश चव्हाण यांनी अनोख्या प्रकारचा सदरा परिधान करून राज्य सरकारचा निषेध केला. सदऱ्यासोबत 'ठाकरे सरकार हाय हाय' असा मजकूर असलेली टोपीसुद्धा त्यांनी घातली होती. मंगेश चव्हाण यांनी केलेला हा पेहराव विधानभवन परिसरात सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होता.