#CrimeNews #Robbery #JalnaCrimeNews #MaharashtraTimes
जालना जिल्ह्याच्या पिंपळखुंटा शेतवस्तीवर मध्यरात्रीच्या सुमारास पाच दरोडेखोरानी सशस्त्र दरोडा घातल्याची घटना घडली. या दरोड्यात दरोडेखोरांनी शेजारील घराच्या दरवाजाच्या कड्या लावून घेतल्या होत्या. घरात दरोडा घालतांना या दरोडेखोरांनी घरातील महिलांना जबर मारहाण करत कुऱ्हाड,धारधार शस्त्राने वार केले. महिलांच्या अंगावर असलेले सोन्या,चांदीचे दागिने ओरबाडून घेतल. घरातील लोखंडी पेटी तोडून पेटीतील १५ हजार रोख,सोन्याची अंगठी असे एकूण ४ लाख रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने लुटून नेले. घटनेची माहिती मिळताच जाफ्राबाद पोलिसानी घटनास्थळी पोहचत चोरीचा तपास सुरू केला आहे