तब्बल नऊ वर्ष शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पद भूषविलेल्या सुभाष काटे यांनी शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' केला आहे. औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन त्यांनी पक्ष सोडल्याचं म्हटलंय. तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या काँग्रेस पक्षाचे जिल्ह्यात वर्चस्व असतानाही लातूर जिल्ह्यात शिवसेना रुजवलेल्या, वाढवलेल्या सुभाष काटे यांना राज्यात पक्षाची सत्ता असताना पक्ष सोडावा लागला.