¡Sorpréndeme!

चेंबूर परिसरात पावडर सदृश्य केमिकलचा पाऊस; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

2021-12-19 616 Dailymotion

चेंबूर येथील गव्हाणगावात अचानक पावडर सदृश्य केमिकलचा पाऊस पडू लागल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. दत्त जयंती निमित्त गावात भंडारा आयोजित करण्यात आला होता आणि याच वेळी ही पावडर भाविकांच्या जेवणात गेल्याने सर्वच भयभीत झाले. दरम्यान, याच परिसरात असलेल्या एच.पी.सी.एल. च्या प्लांटमधून मोठ्या प्रमाणावर कॅटलिस्ट पावडरची गळती होऊन ती सर्वत्र पसरली असल्याची माहिती समोर आली आहे. एच.पी.सी.एल. च्या अधिकाऱ्यांनी ही पावडर विषारी नसून तसे काही झाल्यास दोषीवर कठोर कारवाई करणार असल्याचे सांगितली. संबंधित माहिती आरसीएफ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब घावटे यांनी दिली.