¡Sorpréndeme!

बीड : वानरांच्या हल्ल्यामुळे जिल्ह्यातील २५० कुत्र्यांचा मृत्यू

2021-12-19 2,714 Dailymotion

बीडच्या माजलगाव तालुक्यातील लऊळ गावात वानरांमुळे दहशतीचे वातावरण निर्माण झालंय. वानरांच्या हल्ल्यामुळे या गावातील जवळपास २५० कुत्र्यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, कुत्र्यांच्या शरीरावर असलेले कीटक खाण्यासाठी वानर कुत्र्यांच्या पिलांना झाडावर घेऊन जातात. अनावधानाने ही पिल्लं पडून त्यांचा मृत्यू होत असल्याचं प्राणी मित्रांकडून सांगण्यात येतंय. हे वानर पिसाळलेले नाहीत, त्यामुळे ग्रामस्थांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन त्यांनी केलंय.