¡Sorpréndeme!

बंगळुरूमध्ये महाराजांच्या पुतळ्याची विटंबना; राज्यभरात तीव्र पडसाद

2021-12-18 941 Dailymotion

कर्नाटकमधील बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटायला लागले आहेत. कोल्हापुरात शिवसेनेच्या वतीने महामार्ग रोको आंदोलन करण्यात आले, तर बेळगाव शहरात १४४ कलाम लागू करण्यात आले आहेत. पुण्यातील स्वारगेट एसटी आगारात शिवसैनिकांनी कर्नाटकात जाणाऱ्या बसेसवर भगव्या अक्षरात 'शिवसेना, जय महाराष्ट्र' लिहलंय. तर अनेक ठिकाणी काळा स्प्रे मारून निषेद देखील नोंदवला आहे. यावेळी कर्नाटक सरकार विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.