केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा शनिवार आणि रविवार असे दोन दिवस पुणे दौऱ्यावर असणार आहेत. दोन्हीही दिवस ते पुण्यात मुक्कामी आहेत. अमित शाह यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान त्यांच्या मुक्कामासाठी व्हीव्हीआयपी सूट उपलब्ध करण्यात आला आहे . उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताब्यातील सूटमध्ये अमित शाह आता मुक्कामी राहणार आहे. तर,अमित शाह यांच्या स्वागतासाठी पुणेकरांची तयारी सुरु आहे. याबाबत पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी काय सांगितलं ते पाहुयात.