¡Sorpréndeme!

ओबीसी आरक्षणासंदर्भातील विरोधी पक्षाच्या टीकांवर जयंत पाटील यांचा पलटवार

2021-12-18 115 Dailymotion

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपाने महाविकास आघाडीला घेरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ओबीसी आरक्षण टिकवण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याची टीका ही राज्यातील भाजपा नेत्यांकडून सातत्याने केली जाते. याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपावर पलटवार केला. "मुद्दामून खोडा घालण्यासाठी केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात अशी भूमिका घेतली आहे.” अशी टीका जयंत पाटील यांनी केली. जयंत पाटील शुक्रवारी डोंबिवलीत राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने आयोजित शरद महोत्सवाला भेट देण्यासाठी आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना जयंत पाटील यांनी भाजपावर टीका केली.