#EknathKhadse #AghadiSarkar #MaharashtraTimes
एकनाथ खडसेंच्या उपस्थितीत भुसावळ इथं कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश घेणार्यांचा ओघ आता मोठ्या प्रमाणात वाढला असून भुसावळातील मेळाव्यात याची प्रचिती आली. भविष्यात अजून खूप जण पक्षात येणार असून हा तर फक्त छोटासा ट्रेलरच आहे असं माजी मंत्री एकनाथ खडसे म्हणालेत. भुसावळातील पक्षाच्या मेळाव्यात भुसावळ, सावदा फैजपुर येथील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला