¡Sorpréndeme!

बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलीची सुखरूप सुटका; मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी मानले आभार

2021-12-17 86 Dailymotion

एक वर्षाची चिमुकली खेळताना बोअरवेलमध्ये पडली. स्थानिक प्रशासन, पोलीस आणि लष्कराच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून या चिमुकलीची सुखरूप सुटका केली आहे. मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यात ही गुरुवारी घटना घडली. दिव्यांशी असं या मुलीचे नाव असून तिला पालकांकडे सोपविण्यात आले आहे. प्राथमिक उपचारांसाठी या चिमुकलीला इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. या चिमुकलीचे प्राण वाचविल्याबद्दल मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी स्थानिक प्रशासन आणि जवानांचे आभार मानले आहेत.

#Borewell #MadhyaPradesh #ShivrajSinghChouhan