¡Sorpréndeme!

ओबीसींना परत संधी मिळण्यासाठी प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे, घोर नुकसान झालेलं आहे - पंकजा मुंडे

2021-12-15 119 Dailymotion

ओबीसी आरक्षणासंदर्भात राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायालयानं निर्णय दिला आहे. केंद्र सरकारला इम्पिरिकल डेटा देण्याचे निर्देश देता येणार नाहीत, असं आधीच न्यायालयानं स्पष्ट केल्यामुळे राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ओबीसी आरक्षणाविनाच होणार आहेत.याबाबत भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर टीका केली आहे. अज्ञान, अहंकार आणि दुर्लक्ष यामुळे ओबीसींचं आरक्षण धोक्यात आलं आहे, असं त्या म्हणाल्या आहेत.