¡Sorpréndeme!

'माझं वय २५ नाही, २३ आहे; पण २५ चा होईपर्यंत काही शिल्लक ठेवत नाही'

2021-12-15 158 Dailymotion

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कवठेमहांकाळ नगर पंचायत निवडणुकीचा प्रचार शुभारंभ नुकताच करण्यात आला. या निवडणुकीच्या निमित्ताने दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात होत आहे.
रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या चिन्हावर राष्ट्रवादी काँग्रेस कवठेमहांकाळ नगरपंचायतीची निवडणूक स्वबळावर लढवत आहे. रोहित पाटील यांची भाषण शैलीही हुबेहूब वडील आर. आर. पाटील यांच्यासारखीच आहे.