¡Sorpréndeme!

Pune l पायाने वाईड दाखवणारा हा अंपायर आहे तरी कोण ​l Deepak Naik Navare from Maharashtra l Sakal

2021-12-14 1,006 Dailymotion

जसा क्रिकेटचा हा खेळ बदलत गेला तसेच अंपायरींग ची शैली सुद्धा बदलत गेली..

बिली बाऊडेन यांच्या पावसलावर पाऊल ठेवत महाराष्ट्रातील बाऊडेन अशी एका अंपायर ची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहे. या महराष्ट्रातील बिली बाऊडेन चे नाव आहे दीपक नाईकनवरे. काही दिवसांपूर्वी त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडिया वर धुमाकूळ घालून गेला..

मूळचे पंढरपूर येथील असणारे दीपक नाईक नवरे अत्यंत सामान्य कुटुंबातील आहेत. ज्यावेळी त्यांनी पहिल्यांदा पंच म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यावेळी प्रेक्षकांकडून त्यांना काही रक्कम बक्षीस म्हणून मिळायची

या बक्षिसामुळे त्यांना काम करण्यास अजून प्रोत्साहन वाटू लागले. कारण वडिलांच्या निधनानंतर सर्व जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली होती. त्यावेळी मिळालेल्या पैशातून त्यांना घर चालवता आले. त्यांच्या या वेगळ्या शैलीचे जग भरातून कौतुक होतंय.