#AnilParab #StWorkers #StateTransportCorporation #MaharashtraTimes
परिवहन मंत्री अनिल परब यांनी संपावर गेलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना अल्टिमेटम दिल्याचा आज (13 डिसेंबर 2021 ) शेवटचा दिवस आहे.परभणीत कर्मचाऱ्यांनी परबांच्या अल्टीमेटमला केराची टोपली दाखवली.अल्टीमेटमच्या शेवटच्या दिवसापर्यंत परभणीत एकही कर्मचारी ड्युटीवर हजर झाला नाही.यापूर्वी परभणी जिल्ह्यातून केवळ 14 कर्मचारी कर्तव्यावर हजर झाले होते. मात्र 14 कर्मचाऱ्यांपैकी चार कर्मचाऱ्यांनी रजा घेत घरी बसणे पसंत केले.तर, उर्वरित दहा कर्मचारी हे आजही कर्तव्यावर हजर आहे.