¡Sorpréndeme!

मनसेच्या समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेला दादर चौपाटीपासून सुरुवात; अमित ठाकरेंनी घेतला सहभाग

2021-12-11 172 Dailymotion

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीनिमित्त सर्वच राजकीय पक्ष चांगलेच सक्रिय झाले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडूनही विविध उपक्रम राबवले जात आहेत. मनसेकडून राज्यातील समुद्र किनारा स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत राज्यातील ७२० किमीच्या समुद्र किनाऱ्यावरील प्रमुख ४० किनाऱ्यांवर साफसफाई करण्यात येणार आहे. मुंबईतील समुद्र किनाऱ्यांवर स्वच्छता मोहिमेसाठी शेकडो नागरिकांनी नावनोंदणी केली होती. आजपासून दादर चौपाटीपासून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. मनसे नेते अमित ठाकरेंनी या मोहिमेत सहभाग घेतला. मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील विविध समुद्र किनाऱ्यांवर स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे.