¡Sorpréndeme!

सिंधुदुर्ग : चित्रकाराने जनरल बिपिन रावत यांना दगडावर चित्र रेखाटून वाहिली आदरांजली

2021-12-09 517 Dailymotion

भारतीय संरक्षण दल प्रमुख जनरल बिपिन रावत यांचं ८ डिसेंबर २०२१ रोजी अपघाती निधन झालं. तामिळनाडूत हवाई दलाचे एमआय १७ व्ही ५ हे हेलिकॉप्टर कोसळून अपघात झाला. या अपघातात जनरल रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि हेलिकॉप्टरमधील लष्करी अधिकारी यांचा देखील मृत्यू झाला. सिंधुदुर्गमधील चित्रकार सुमन दाभोलकर याने जनरल रावत यांना अनोखी मानवंदना दिली आहे. सुमन दाभोलकर या चित्रकाराने दगडावर जनरल बिपिन रावत यांचं चित्र रेखाटून त्यांना आदरांजली वाहिली आहे.

#BipinRawat #art #stoneart #tribute #sindhudurga