¡Sorpréndeme!

पिंपरी-चिंचवड : गॅस गळतीमुळे भीषण स्फोट; दोनजण गंभीर जखमी

2021-12-08 257 Dailymotion

पिंपरी-चिंचवडमध्ये घरगुती गॅस गळती होऊन झालेल्या भीषण स्फोटात दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना ८ डिसेंबर रोजी दुपारी एकच्या सुमारास पिंपळे गुरव परिसरात घडली. जखमी तरुणांवर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा स्फोट इतका भीषण होता की घराच्या भींतीला तडे गेले. त्याचबरोबर खिडक्यांच्या काचा देखील फुटल्या आहेत. दरम्यान, हे दोन्ही तरुण परराज्यातील असून दोघेही डिलिव्हरी बॉयचं काम करतात.