¡Sorpréndeme!

काय म्हणता... जॉब स्वीच करतानाही नोकरदारांना सरकारला द्यावा लागणार GST?

2021-12-08 154 Dailymotion

सध्या अनेक क्षेत्रांमध्ये जॉब स्वीच करायचं म्हणजेच नोकरी बदलण्याचं प्रमाण वाढलं आहे. पगारवाढीसाठी अनेक जण जॉब बदलताना दिसतात. यासाठी कंपनीने ठरवून दिलेला नोटीस पिरियडचा कालावधीही काही जणांकडून पूर्ण केला जात नाही. काही वेळेस कंपन्या देखील समोरच्या व्यक्तीला लवकरात लवकर नोकरीवर रुजू करुन घेण्यासाठी नोटीस पिरियड बाय आऊट करताना दिसतात. तुम्ही देखील अशाप्रकारे जॉब स्वीच करण्याचा विचार करत असाल, तर थोडं थांबा. कारण आता नोटीस पिरियडचा कालावधी पूर्ण न करता तुम्ही जॉब स्विच केलात तर तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो. नोकरी सोडताना नोटीस पीरियडचा कालावधी पूर्ण न केल्यास नोटीस पीरियडच्या कालावधीमध्ये मिळालेल्या संपूर्ण वेतनावर आता कर्मचाऱ्याला १८ टक्के जीएसटी भरावा लागणार आहे.