¡Sorpréndeme!

'पाच दिवसापासून लाईन गेली.. गहू, हरभरं वाळून चाललं, ढोरांना पाणी नाही'

2021-12-02 1 Dailymotion

अतिवृष्टीने हातातोंडाशी आलेला घास गेला.. शेतकऱ्याने दम धरला.. आणि तो पुन्हा नव्या उमेदीने रब्बी हंगामासाठी उभा राहिला... पण महावितरणने सुलतानी संकट बनून आता रब्बी हंगामही अडचणीत आणलाय. हे आहेत हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी लक्ष्मण दळवी.. पाच दिवसांपूर्वी त्यांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आलाय. आता गव्हाला ना पाणी देता येतंय, ना नुकतंच उगवून आलेल्या कोवळ्या हरभऱ्यासाठी त्यांच्याकडे वीज पुरवठा आहे..