¡Sorpréndeme!

ट्विटरचे नवे सीईओ पराग अग्रवाल यांच्या पगाराचा आकडा ऐकून थक्क व्हाल

2021-12-01 3,563 Dailymotion

ट्विटरच्या मुख्य कार्यकारी पद म्हणजे सीईओपदी भारतीय वंशांचे पराग अग्रवाल यांची वर्णी लागली आहे. ट्विटर कंपनीचे सहसंस्थापक जॅक डॉर्सी यांची जागा पराग अग्रवाल घेणार असल्याची घोषणा २९ नोव्हेंबरला करण्यात आली. ट्विटरच्या सीईओपदी पराग अग्रवाल यांची वर्णी लागल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्याबद्दलच्या चर्चा देखील रंगू लागल्या. पराग अग्रवाल यांच्या पगाराविषयीही चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं. कारण कितीही काहीही झालं तरी पगार हा भारतीयांच्या अगदीच जवळचा विषय. ट्विटरच्या सीईओपदी विराजमान होणाऱ्या पराग अग्रवाल यांना किती पगार दिला जाणारे असा प्रश्न तुम्हालाही पडलाय का? या प्रश्नाचं उत्तर घेऊन आलो आहोत या व्हिडीओच्या माध्यमातून.