¡Sorpréndeme!

खाई के पान बनारस वाला; पान स्टॉलवर पंकजा मुंडेंनी स्वतः तयार केलं पान

2021-11-29 1 Dailymotion

औरंगाबादहून परळीला जात असताना भाजपाच्या राष्ट्रीय सचिव बीड जिल्ह्यातील बशीरगंज भागात पोहोचल्या. पंकजा मुंडे आल्याचं समजताच या भागातील शेख जमील यांनी पंकजा मुंडेंना त्यांच्या जमील पान सेंटरला भेट देण्याचा आग्रह केला. मुंडेंनीही हा आग्रह स्वीकारत त्यांच्या पान सेंटरला भेट दिली. पान सेंटरमध्ये गेल्यावर स्वतः पान तयार करण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही. त्यांनी स्वतः पानाचा आस्वाद तर घेतलाच पण सोबतच्या सर्व सहकाऱ्यांनाही पान बनवून दिले.

#pankajamunde #beed #panstall