¡Sorpréndeme!

अमरावतीमधील हिंसात्मक घटनांवर पोलिसांचे नियंत्रण; आतापर्यंत ५७ गुन्हे दाखल

2021-11-24 323 Dailymotion

त्रिपुरामधील घटनेच्या विरोधात अमरावतीत १२ नोव्हेंबर दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर १५ ते २० हजार लोकांनी निषेध मोर्चा काढला होता. मात्र या मोर्चाला हिंसक वळण लागले. यात अमरावती शहरातील २० ते २२ दुकानात तोडफोड झाली. काही दुकानादारांना मारहाण करण्यात आली. त्यामुळे शहरात तणाव निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. या मोर्चाच्या विरोधात भाजपाने दुसऱ्या दिवशी म्हणजे १३ नोव्हेंबर रोजी अमरावती शहर बंदचे आवाहन केलं. मात्र, या बंद दरम्यान आंदोलकांनी हिंसा केल्याचं पहायला मिळालं. यानंतर आता हे प्रकरण पोलिसांच्या नियंत्रणात येत असून या प्रकरणात आतापर्यंत एकूण ५७ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तर ३१५ जणांना अटक करण्यात आलं असल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ.आरती सिंह यांनी दिली आहे.