¡Sorpréndeme!

जाळ्यात अडकलेल्या सव्वाशे किलो वजनाच्या कासवाची सुटका करताना फुटला घाम

2021-11-21 779 Dailymotion

पालघरमधील तारापूर येथे मासेमारीसाठी टाकलेल्या जाळ्यात तब्बल सव्वाशे किलोपेक्षा अधिक वजनाचे कासव अडकले. जगदीश विंदे यांनी धरण पद्धतीने मासेमारी करण्यासाठी समुद्रकिनारी जाळे रोवून ठेवले होते. २० नोव्हेंबर २०२१ रोजी संध्याकाळी जाळ्यात कासव अडकल्याचे त्यांच्या लक्षात आले. सहकाऱ्यांच्या मदतीने जगदीश विंदे यांनी या कासवाची सुखरूप सुटका करत त्याला समुद्रात सोडून दिले. पण सव्वाशे किलोपेक्षा अधिक वजन असलेल्या या कासवाची सुटका करताना मात्र सगळ्यांनाच घाम फुटला.