¡Sorpréndeme!

कल्याणमधील गावात आढळलेल्या अजगराची सर्पमित्रांकडून सुटका

2021-11-21 975 Dailymotion

कल्याणमधील कांबा गाव परिसरातील टाटा पावर कंपनीत सात फुटाचा अजगर आढळला. यामुळे कामगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. कंपनीच्या सुरक्षा रक्षकांनी कंपनीत अजगर आल्याची माहिती सर्पमित्रांना दिली. त्यांनतर सर्पमित्र विवेक गंभीरराव व संदेश वाडेकर यांनी अजगराला पकडून कल्याण वनविभाग खात्याच्या अधिकाऱ्यांना दिले असून लवकरच या अजगराला जंगलात सोडण्यात येणार आहे. मात्र या परिसरात अजगर आढळल्याने सर्पमित्रांसह परिसरातील नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहे.