¡Sorpréndeme!

राज्य शासनात विलनीकरण करण्याची मागणी असताना एसटीच्या खासगीकरणाचे संकेत

2021-11-20 705 Dailymotion

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागण्यांसाठी संप पुकारला आहे. गेले कित्येक दिवस कर्मचारी त्यांच्या परिवारासह विविध प्रकारे आंदोलन करत आहेत. एसटी कामगारांच्या संपाचा तिढा कायम असताना एसटीचा खासगीकरणाकडे प्रवास सुरू असल्याचे संकेत आहेत. गेल्या काही वर्षांपासून तोट्यात गेलेली एसटी नफ्यात आणण्यासाठी एसटीच्या खासगीकरणाचा पर्याय पुढे आला असून, याबाबत अभ्यास करण्यासाठी ‘केपीएमजी’ या खासगी संस्थेची सल्लागार म्हणून निवड करण्यात आली आहे. एसटीच्या खासगीकरणासाठी उत्तर प्रदेशातील खासगीकरणाचा पॅटर्न राबविला जाणार असल्याचं बोललं जात आहे.