#karhad #satara #leopard #leopardattack #boykilledinleopardattack
कऱ्हाड / विंग (सातारा) : ऊस तोडणीसाठी आलेल्या मजुराच्या अवघ्या तीन वर्षाच्या मुलाला उसाच्या शिवारात बिबट्यानं (Leopard) उचलून नेलं. काही अंतर गेल्यावर संबंधित मुलाला ठार करून त्याला तिथेच सोडून बिबट्यानं उसाच्या शिवारात धूम ठोकली. आकाश पावरा (वय 3) असं त्या मुलाचं नाव आहे. या घटनेमुळं त्या परिसरात बिबट्याची मोठी दहशत निर्माण झालीय. घटनास्थळी वनविभागाचे (Forest Department) कर्मचारी दाखल झाले असून ग्रामस्थांनी त्यांच्यावर बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा न लावल्यामुळे रोष व्यक्त केला आहे. दरम्यान, घटनास्थळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली आहे. (व्हिडिओ : हेमंत पवार, विलास खबाले)