¡Sorpréndeme!

अमरावती शहरात कर्फ्यूदरम्यान अनेक निर्बंध लागू; इंटरनेट सेवा बंद

2021-11-14 345 Dailymotion

त्रिपुरा राज्यातील घटनेचे अमरावती शहरात तीव्र पडसाद उमटले. त्रिपुरात घडलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ १२ नोव्हेंबर रोजी काढण्यात आलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले. या मोर्चाच्या विरोधात भाजपाने १३ नोव्हेंबर रोजी 'अमरावती बंद'ची हाक दिली होती. मात्र या दरम्यान देखील दंगा झाला. अमरावती शहरातील हिंसाचारानंतर प्रशासनाकडून शहरात ४ दिवसांसाठी कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.