¡Sorpréndeme!

'एसटीचं राज्य शासनात विलीनीकरण झालंच पाहिजे"; बीडमध्ये कर्मचाऱ्यांचं अर्धनग्न आंदोलन

2021-11-13 483 Dailymotion

राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे. बीडमध्ये एसटी कर्मचारी गेले दहा दिवस आंदोलनास बसले आहेत. मात्र तरीदेखील सरकारकडून दखल घेतली जात नसल्यामुळे बीड आगारातील चालक आणि वाहकांनी अर्धनग्न होत आंदोलन केले. सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी बीड आगारातील कर्मचाऱ्यांकडून दररोज वेगवेगळे लक्षवेधी आंदोलन केले जात आहे. राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन होत असले तरी कर्मचारी मात्र आपल्या मागण्यांवर ठाम असून संप मागे न घेण्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे.