¡Sorpréndeme!

एसटी कामगारांच्या प्रश्नावर राहू ठाकरे सरकारशी बोलणार - बाळा नांदगावकर

2021-11-11 290 Dailymotion

गेल्या 12 दिवसांपासून राज्यात एस टी करणचार्यांचा संप सुरू आहे. या संपात जवळपास 28 संघटना सामील झाल्या असून आज एसटी संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. एसटी कर्मचारी संघटनेची लोकं साहेबांना भेटली, 28 संघटनांना बाजूला ठेवून एसटी कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. एसटी महामंडळचे विलीनीकरण करावे अशी प्रमुख मागणी आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या विषयावर लवकरच राज ठाकरे सरकारशी बोलणार आहेत. मुख्यमंत्री हॉस्पिटलमध्ये दाखल असल्याने राज ठाकरे कोणाशी बोलणार असा प्रश्न पत्रकारांनी मनसे नेते बाळा नांदगावकर यांना विचारलं असता बाळा नांदगावकर म्हणाले,राज साहेबांना कोणाशी बोलावं लागेल ते त्यांना आणि तुम्हाला माहीत आहे.