¡Sorpréndeme!

पुणे : राज्य सरकारविरोधात एसटी कर्मचाऱ्यांचं मुंडन करत आंदोलन; मुख्यमंत्र्यांना दिले आशीर्वाद

2021-11-11 289 Dailymotion

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. पुण्यातील स्वारगेट बस आगाराच्या बाहेर एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. कर्मचाऱ्यांनी मुंडन करत एसटीच्या विलीनीकरणासाठी राज्य सरकारविरोधात आंदोलन केलं. आंदोलनादरम्यान उपचारासाठी इस्पितळात दाखल झालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एसटी कर्मचाऱ्यांनी आशीर्वाद देखील दिले.