नवाब मलिक हे कुठल्याही प्रकारची कागदपत्रे सादर न करता पुरावे सादर न करता केवळ आरोप करत राहणं अशा प्रकारचं काम नवाब मलिक करत आहेत. त्यांनी हाजी अराफत शेख आणि मुन्ना यादव यांचं नाव घेतलं. माझा त्यांना सवाल आहे की हाच त्यांचा हायड्रोजन बॉम्ब होता का? काल जो देवेंद्र फडणवीस यांनी जो स्फोट केला आहे त्यातून ते अजूनही सावरलेले दिसत नाही. कारण त्यांचे 1993 मधल्या आरोपी सोबतचे संबंध आता समोर आलेले आहेत त्यामुळे त्यांच्यावर आता देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. त्यांनी जे आरोप केले तेव्हा फुटकळ आरोप आहे. त्याला कसलाही आधार नाही नवाब मलिक यांचं डोकं ठिकाणावर नाही. त्यांनी मानसोपचार तज्ञाकडे जाऊन उपचार करावा असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.
#PravinDarekar #NawabMalik