¡Sorpréndeme!

'एका सेल्फीने खेळ बिघडवला...' नवाब मलिक यांचा खळबळजनक आरोप !

2021-11-07 557 Dailymotion

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात रोज नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक आणि एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यामध्ये सातत्याने आरोप-प्रत्यारोप सुरू असताना आज नवाब मलिक यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आर्यन खानचं अपहरण करून खंडणी उकळण्याचा हा सगळा डाव असल्याचा आरोप केला आहे. शिवाय या अपहरण नाट्याचे मास्टरमाईंड मोहीत कंबोज असल्याचा देखील दावा नवाब मलिक यांनी केला आहे.