¡Sorpréndeme!

वर्धा : एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळला; कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी कुटुंबीयही आंदोलनात सहभागी

2021-11-05 646 Dailymotion

राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे. करोना काळात जीवाची पर्वा न करता नागरिकांना आपल्या कामाच्या ठिकाणी पोहचवण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी काम केले. परंतु अजूनही त्यांच्या मागण्यांना राज्य सरकार गांभीर्याने घेत नसल्याने वर्धा येथे एसटी कर्मचाऱ्यांसोबतच त्यांचे कुटुंबीयही आंदोलनास बसले आहेत. राज्यात अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी आर्थिक परिस्थितीमुळे आत्महत्या केल्या आहेत. दिवाळीच्या पहिल्या दिवशी एसटी कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांवर बेसन भाकर खाऊन दिवाळी साजरी करण्याची वेळ आली. सगळ्या मागण्या मान्य केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचं एसटी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे.

#MSRTC #Strike #Maharashtra