¡Sorpréndeme!

जळगाव - छत्रपती शिवरायांचे शूरवीर मावळे; चिमुकल्या हातांनी साकारले गडकिल्ले

2021-11-05 130 Dailymotion

दिवाळी हा सण संपूर्ण राज्यात अगदी धुमधडाक्यात साजरा केला जातो. दिवाळीत लहानग्यांचा उत्साह तर अगदी पाहण्यासारखा असतो. फटाके फोडण्यासोबतच दिवाळीचा फराळ, आकाशकंदील, रांगोळी बनवण्यातही त्यांची लुडबूड असते. याच चिमुकल्या हातांनी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांच्या प्रतिकृती साकारल्या आहेत. जळगावातील छत्रपती शिवरायांच्या या शूरवीर मावळ्यांनी प्रतापगडाची प्रतिकृती साकारली आहे. ऐतिहासिक किल्ल्यांची जपणूक व्हावी व पुढील पिढीला किल्ल्यांविषयी माहिती मिळावी हा त्यामागचा उद्देश असल्याचं हे चिमुकले सांगतात.

#Diwali2021 #Pratapgad #ChhatrapatiShivajiMaharaj #Jalgaon