भारत इतर देशांना मदत करण्याच्या बाबतीत नेहमीच तत्पर असतो. करोना सारख्या महामारीच्या संकटात देखील भारताने १५० देशांना मदत करत 'वसुधैव कुटुम्बकम्' खऱ्या अर्थाने साध्य केलं. याबाबत अनेक देशांनी भारताचे आभार देखील मानले. काही महिन्यांपूर्वी तालिबानची सत्ता आलेल्या अफगाणिस्तानसाठी देखील भारताने असाच मदतीचा हात पुढे केला आहे. परंतु यात पाकिस्तानची भूमिका महत्वाची ठरणार आहे. पाकिस्तानने सहकार्याची भूमिका घेतली तरचं भारताला अफगाणिस्तानला मदत करणं सोपं होणार आहे.