¡Sorpréndeme!

ईडीला अटक करायला खडसे आणि मलिकांचे जावई कसे भेटतात?; राऊतांचा सवाल

2021-11-02 402 Dailymotion

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना १०० कोटी वसुली प्रकरणात ईडीकडून अटक करण्यात आली आहे. अनेक दिवस बेपत्ता असलेले देशमुख काल अचानक ईडी कार्यालयात हजर राहिले. १२ तासांहून अधिक काळ चौकशी केल्यानंतर सोमवारी रात्री त्यांना अटक करण्यात आली. यावरून आता महाविकास आघाडीतील नेत्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. देशमुखांना झालेली अटक कायदा, नीतिमत्तेला धरून नसल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांचं म्हणणं आहे.