मुंबई क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. काही दिवसांपूर्वी या प्रकरणातील पंच प्रभाकर साईलने गौप्यस्फोट करत एनसीबीने खोट्या पंचनाम्यावर सही करायला लावली होती, असा आरोप केला होता. आता एनसीबीने काही महिन्यांपूर्वी खारघर येथे अंमली पदार्थांविरोधी केलेल्या कारवाईतील पंचाने देखील समीर वानखेडेंनी कोऱ्या कागदावर सह्या घेतल्याचा आरोप केला आहे. या व्यक्तीने कोपरखैरणे पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली आहे.