¡Sorpréndeme!

नवाब मलिकांनी वानखेडेंचा जन्मदाखला केला शेअर; क्रांती रेडकरनं दिलं मलिकांना उत्तर

2021-10-25 1,702 Dailymotion

मुंबई ड्रग केस प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा ट्विट करत समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधलाय. वानखेडे यांनी मुस्लिम असल्याचं लपवून चुकीच्या पद्धतीने कागदपत्रांचा वापर करुन नोकरी मिळवल्याचा दावा मलिक यांनी केलाय. इतकंच नाही तर नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचा एक जुना फोटो शेअर करत पहचान कौन? असं उपहासात्मक ट्वीटदेखील केलं आहे. त्यांच्या या ट्विटला समीर वानखेडे आणि अभिनेत्री क्रांती रेडकरने उत्तर दिलं आहे.