¡Sorpréndeme!

Mumbai ; महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही - मुख्यमंत्री ; पाहा व्हिडीओ

2021-10-23 451 Dailymotion

जगातील अमली पदार्थ जणू काही महाराष्ट्रातच तयार होत आहेत आणि ते पकडण्याची कामगिरी फक्त विशेष चमूच पार पाडू शकते, असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. अंमली पदार्थांच्या आडून अशी वातावरणनिर्मिती करून राज्याला बदनाम करण्याचा हा डाव आहे असा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलाय...महाराष्ट्र पोलिसांच्या कामगिरीला अशा पद्धतीने डावलण्याचा प्रयत्न होत असेल तर तो खपवून घेतला जाणार नाही असा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिलाय...नागपुरातील जलदगती डीएनए तपासणी आणि वन्यजीव तपासणी प्रयोगशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमात त्यांनी ऑनलाइन सहभागी होऊन महाराष्ट्र पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले. सोबतच महाराष्ट्रात अमली पदार्थवरून तापलेल्या वातावरणावरही अप्रत्यक्ष भाष्य केले.


#maharashtra #uddhav thakre police # breaking #esakal #sakalmedia