¡Sorpréndeme!

पंजाब : आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर अमरिंदर सिंग यांचा मोठा निर्णय

2021-10-20 442 Dailymotion

पंजाबच्या मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागल्यानंतर जवळपास महिन्याभराने अमरिंदर सिंग यांनी मोठा निर्णय घेतला असून विशेष म्हणजे भाजपानेही या निर्णयाचं स्वागत केलं आहे. अमरिंदर सिंग यांच्या प्रसारमाध्यम सल्लागारांनी काही ट्विटरच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती दिलीय. मागील काही दिवसांपासून दिल्लीत असणाऱ्या या सल्लागारांनी अमरिंदर सिंग यांच्यावतीने केलेल्या ट्विटमध्ये पंजाब आणि येथील लोकांच्या तसेच मागील वर्षभरापासून आपल्या अस्तित्वासाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांच्या हितासाठी लवकरच नवीन पक्षाची घोषणा करणार असल्याचं म्हटलंय.