¡Sorpréndeme!

उस्मानाबाद : औरंगजेबाविषयीच्या व्हायरल पोस्टवरून दोन गटात दगडफेक

2021-10-20 1,420 Dailymotion

उस्मानाबादमध्ये सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या औरंगजेबाविषयीच्या पोस्टवरून दोन गटात तुफान दगडफेक झाली. मंगळवारी (१९ ऑक्टोबर) रात्री १० च्या सुमारास शहरातील विजय चौक येथे ही घटना घडली. या दगडफेकीत विजय चौक येथे पोलीस बंदोबस्तासाठी असलेले ४ पोलीस जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रशासनाने बंदोबस्त लावत परिस्थिती नियंत्रणात आणली असून पोलीस प्रशासन दोन्ही गटातील कायदा हातात घेणाऱ्यांवर कार्यवाही करत आहे.