¡Sorpréndeme!

नांदेड : भास्करराव खतगावकर यांची भाजपाला सोडचिठ्ठी; काँग्रेसमध्ये करणार प्रवेश

2021-10-17 898 Dailymotion

देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजपाकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज असणारे जेष्ठ नेते भास्करराव खतगावकर यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्याच्यासमवेत माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा हे देखील कॉंग्रेसमध्ये पुन:प्रवेश करण्यार आहेत. या दोन्ही नेत्यांचे कॉंग्रेसमध्ये स्वागत केले जाईल असे कॉंग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. गेल्या काही दिवसापासून खतगावकर भाजप नेत्यांवर नाराज होते. सुभाष साबणे यांना उमेदवारी दिल्यानंतर होणाऱ्या प्रचारसभांना विविध कारणे देऊन खतगावकरांनी जाण्याचे टाळले होते.