¡Sorpréndeme!

पंढरपूर: ...अन् विठ्ठल मंदिर परिसरात दाखल झालं बॉम्बशोधक पथक

2021-10-13 584 Dailymotion

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर परिसरात बॉम्ब असल्याची माहिती पोलीस प्रशासनाला मिळाली आणि तातडीने बॉम्बशोधक पथक, अग्निशामक दल आणि रुग्णवाहिका या परिसरात दाखल झाले. सर्व दुकाने तात्काळ बंद करण्यात आली व भाविकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. परिसरातील संशयित वस्तूंची बॉम्बशोधक पथकाने तपासणी केली. श्वानपथकानेही संपूर्ण परिसर पिंजून काढला. त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.