¡Sorpréndeme!

रेल्वे सुरक्षेची जबाबदारी महाराष्ट्र पोलिसांइतकीच केंद्र सरकारचीही आहे - डॉ.नीलम गोऱ्हे

2021-10-11 204 Dailymotion

लखनऊहून मुंबईकडे येत असलेल्या पुष्पक एक्सप्रेसमध्ये शनिवारी इगतपुरीजवळ प्रवाशांची लुटमार करून एका महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. शस्त्रांचा धाक दाखवून दरोडेखोरांनी प्रवाशांकडून मोबाईल, रोख रक्कम लुटली. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. रेल्वे सुरक्षेची जबाबदारी महाराष्ट्र पोलिसांइतकीच केंद्र सरकारची देखील आहे, असं शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या आहेत.