¡Sorpréndeme!

पिंपरी-चिंचवड : ९वर्षीय मुलाला कारने चिरडले; महिलेवर गुन्हा दाखल

2021-10-09 3,254 Dailymotion

पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे सौदागर येथे एका सोसायटीत ९ वर्षीय मुलाला कारने चिरडल्याची घटना घडली आहे. इनोश प्रदीप कसब असे जखमी मुलाचे नाव असून सोनल देशपांडे असे वाहनचालक महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इनोश प्ले एरियात इतर मित्रांसोबत खेळत होता. आऊट गेटच्या अगोदर तो खाली बसला आणि तेवढ्यात भरधाव आय टेन कारने इनोशला चरडले. हे पाहून इतर मुले पळू लागली. घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, इनोश ला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तो गंभीर जखमी आहे. या प्रकरणी वाहनचालक महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.