विकासकामांसाठी राज्यासह केंद्राकडून निधी उपलब्ध करुन घेणार : उदयनराजे
सातारा : नगरपरिषद ही नागरिकांची संस्था आहे. या मातृसंस्थेच्या माध्यमातून जनतेच्या मुलभूत गरजांची पूर्तता करण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न केला आहे. कोरोनाच्या काळात सर्वच खर्चावर बंधने-मर्यादा येत असल्या तरी प्रामुख्याने हद्दवाढ झालेल्या भागाचा मुलभूत विकास साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न सातारा विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही करीत आहोत. त्यासाठी लागणारा निधी राज्य आणि केंद्राकडून उपलब्ध करुन घेणे, नगरपरिषदेच्या स्वनिधीतून विकास साधणे, असे विविध प्रयत्न सुरु आहेत. हद्दवाढ झालेल्या ठिकाणी आम्ही विकासाकरिता कुठेही कमी पडणार नाही, असे मत सातारा विकास आघाडीचे अध्यक्ष, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले. सातारा नगरपरिषदेच्या शाहूपुरी भागातील विविध विकासकामांचे भूमिपूजन, लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी तत्कालीन शाहूपुरी ग्रामपंचायतीचे सरपंच-सदस्य, पंचायत समिती माजी सदस्य संजय पाटील, सिध्दार्थ निकाळजे, नगरपरिषदेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. (व्हिडिओ : प्रमोद इंगळे)
#udayanrajebhosale #Satara #Politics