¡Sorpréndeme!

लखीमपूर खेरी हिंसाचारात केंद्रस्थानी असलेले अजय कुमार मिश्रा कोण आहेत?

2021-10-08 400 Dailymotion

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचाराचे देशभर तीव्र पडसाद उमटत आहेत. ही घटना घडल्यापासून अजय कुमार मिश्रा हे नाव चर्चेत आहे. अजय कुमार मिश्रा यांच्या बनवीरपूर गावात ही घटना घडली. मिश्रा यांच्या मालकीच्या गाड्यांच्या ताफ्याने शेतकर्‍यांच्या समूहाला धडक दिल्याने लखीमपूर खेरीमध्ये चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला. हिंसाचारातील दोन कारपैकी एक कार अजय कुमार मिश्रा यांचे पुत्र आशीष मिश्रा यांची होती, असा आरोप आहे. आशीष मिश्रा यांच्यासह अनेकांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लखीमपूर खेरी घटनेनंतर चर्चेत आलेले अजय कुमार मिश्रा नक्की कोण आहेत, जाणून घेऊया.