दहिवडी (सातारा) : शासनाच्या आदेशानुसार आज तब्बल दीड वर्षानंतर शाळा सुरु झाल्या आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या मलवडी (ता. माण) येथील त्रिंबकराव काळे विद्यालय या विद्यालयात अतिशय उत्साहात विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली. या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी शिक्षण विस्तार अधिकारी सोनाली विभूते या आवर्जून उपस्थित होत्या. (व्हिडिओ : रुपेश कदम)
#dahiwadi #satara #sataranews #reopeningschool #openingschool #schoolreopening