¡Sorpréndeme!

Gondavale: भारतीय सेनेतून सेवानिवृत्त झालेल्या जवानाची जल्लोषात मिरवणूक

2021-10-03 2 Dailymotion

गोंदवले (सातारा) : कडाडणाऱ्या हलग्या...सडा रांगोळ्यांनी सजलेले रस्ते...फुलांनी सजविलेल्या वाहनातून काढलेल्या मिरवणूकीसमोर मर्दानी खेळ अन 'जय जवान जय किसान'च्या जयघोषाने दणाणलेला परिसर अशा उत्साही वातावरणात झालेल्या स्वागताने जवान अमोल अवघडेंचा ऊर अभिमानाने भरून आला होता. भारतीय सेनेतून सेवानिवृत्त झालेल्या श्री. अवघडे यांचा गोंदवलेकरांनी केलेला स्वागत सोहळा ऐतिहासिक ठरला. भारतीय सीमेचे रक्षण करून गोंदवले खुर्द (ता. माण) येथील अमोल गुलाब अवघडे वीस वर्षानंतर सेवानिवृत्त झाले. आज ते आपल्या गावी परतल्यावर गावकऱ्यांनी उत्स्फूर्त स्वागत केले. गावाच्या सीमेपासून अवघडेंच्या घरापर्यंतचा रस्ता सडा रांगोळ्यांनी सजला होता. जवान अवघडे यांच्यासह त्यांचे आईवडील व माणचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांची यावेळी वाहनातून मिरवणूक काढण्यात आली होती. जागोजागी महिलांकडून औक्षण करून स्वागत केले जात होते. यावेळी माजी सैनिक व ग्रामस्थांनी केलेल्या वंदे मातरम व जय जवान जय किसान च्या जयघोषाने सारा परिसर दणाणून गेला होता. (व्हिडीओ : फिरोज तांबोळी)
#indianarmy #soldier #indainarmysoldier #jawan